suicide

आई, वडिल आणि तीन मुलं या सर्वानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. कमालीच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं आता स्पष्ट झालंय.  गेल्या शनिवारपर्यंत या कुटुंबातील कुणी ना कुणी दिसत आणि भेटत होतं. मात्र शनिवारनंतर त्यांच्यापैकी कुणीच भेटलं किंवा दिसलं नाही, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलीय. त्यानंतर अचानक या पाचही जणांनी गळफास घेतल्याची बातमी समजली आणि गावकऱ्यांसह पंचक्रोशीला धक्का बसला. 

    बिहारच्या सुपौल जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सर्वांनाच धक्का बसला. एकाच कुटुंबातील पाच जणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संवपली. यामागचं कारण सुरुवातील स्पष्ट होत नव्हतं, मात्र या घटनेनंतर लवकरच ते कारणही स्पष्ट झालं आणि प्रत्येकाचे डोळे पाणावले.

    आई, वडिल आणि तीन मुलं या सर्वानी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. कमालीच्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं आता स्पष्ट झालंय.  गेल्या शनिवारपर्यंत या कुटुंबातील कुणी ना कुणी दिसत आणि भेटत होतं. मात्र शनिवारनंतर त्यांच्यापैकी कुणीच भेटलं किंवा दिसलं नाही, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिलीय. त्यानंतर अचानक या पाचही जणांनी गळफास घेतल्याची बातमी समजली आणि गावकऱ्यांसह पंचक्रोशीला धक्का बसला.

    सुपौत जिल्ह्यातील राघोपूर गावात हा प्रकार घडला. मिश्रिलाल असं या कुटुंबातील प्रमुखाचं नाव. मिश्रीलाल आणि त्यांचं कुुटुंब गेल्या दोन वर्षांपासून कोळसा विकून आपला उदरनिर्वाह करत होतं. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे मिश्रीलाल यांनी नुकतीच आपली जमीनदेखील विकली होती. गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब गावापासून वेगळं राहत असल्याचं निरीक्षणही गावकऱ्यांनी नोंदवलं आहे.

    या प्रकरणी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं असून त्यातून या प्रकरणाबद्दल अधिक माहिती समोर येऊ शकणार आहे. मात्र अशा प्रकारे रातोरात एका अख्ख्या कुटुंबानं आत्महत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.