building collapsed in ahmadabad

अहमदाबाद (Ahmedabad)मध्ये एक पाच मजली इमारत कोसळली (Building collapsed) आहे. 

    अहमदाबाद: गुजरातला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला असताना आणखी एक भयानक घटना घडली आहे. अहमदाबाद (Ahmedabad)मध्ये एक पाच मजली इमारत कोसळली (Building collapsed) आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदाबादमधील जमालपूर येतील काझीच्या ढाब्याजवळ एक पाच मजली इमारत आज अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याचं पहायला मिळालं. इमारत कोसळल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला.

    या इमारतीत अनेक कुटुंब राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून इमारत कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्या खाली अडकल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.