5जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, अफवा पसरवल्यास कठोर कारवाई करणार

 देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.  हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्रं पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

    चंदीगड: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. ५ जी नेटवर्कमुळे कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या अफवा मागील काही दिवसांपासून पसरत आहेत. हरियाणात या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच अशा प्रकारच्या अफवा परसविल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा विजय वर्धन यांनी दिला आहे.

    देशात अजून 5जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.  हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी एक पत्रक काढून हा इशारा दिला आहे. त्यांनी राज्यातील सर्व डीसी आणि एसपींना हे पत्रं पाठवून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

    दरम्यान, कोरोनाचा आणि 5जीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वर्धन यांनी पोलिसांना दिले आहेत.