भरघाव कारची टँकरला धडक, ६ जणांचा होरपळून मृत्यू ; अपघातात शरीरातील अवयवांचे झाले असे तुकडे

रात्री १ वाजताच्या सुमारास पार्टीतून घरी निघालेले हे ६ मित्र नशेत होते. लसूडिया पोलीसचे उपनिरीक्षक नरसिंग पाल यांनी सांगितलं की, तलावली चांदा येथील पेट्रेल पंपाजवळ रात्री १ च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरघाव कारची रस्त्यावरील उभ्या असलेल्या टँकरसोबत जोरदार धडक झाली. त्यानंतर या तरूणांचे पार्थिव बाहेर काढण्यासाठी कटरची व्यवस्था करण्यात आली. सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं.

    निरंपूरमधील चौकात काल ( सोमवार ) रात्री १ वाजताच्या सुमारास भरघाव कारची टँकरला धडक होऊन ६ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इतकी भीषण होती की, यामध्ये कारच्या काचा तुटून ४ मित्रांचा गंभीर मृत्यू झाला. अपघातात काहींच्या हाताची बोटे तुटली, तर शरीरातील धडचं वेगळं झालं. ६ मित्रांपैकी २ जणं गंभीर जखमी झाले होते. परंतु काही क्षणांतच त्यांनी श्वास सोडला. गँसच्या कटरने कारला कापून त्यांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले.

    मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजताच्या सुमारास पार्टीतून घरी निघालेले हे ६ मित्र नशेत होते. लसूडिया पोलीसचे उपनिरीक्षक नरसिंग पाल यांनी सांगितलं की, तलावली चांदा येथील पेट्रेल पंपाजवळ रात्री १ च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरघाव कारची रस्त्यावरील उभ्या असलेल्या टँकरसोबत जोरदार धडक झाली. त्यानंतर या तरूणांचे पार्थिव बाहेर काढण्यासाठी कटरची व्यवस्था करण्यात आली. सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. ६ पैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता. आणि २ जणं गंभीररीत्या जखमी होते. परंतु रूग्णालयात दोघांनाही दाखल केले असता काही क्षणातच त्यांनी देखील आपले प्राण सोडले.

    पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या धर्मेंद्र यादवेने सांगितलं की, तो पेट्रोल पंपावर काम करत होता. रात्री १ वाजताच्या सुमारास तो पंपावरच होता. त्याच दरम्यान, हायवे दिशेने एक मोठा आवाज ऐकू आला. धावत जाऊन पाहिले असता, एका कारचा रस्त्याच्या किनारी उभा असलेल्या टँकरला भीषण अपघात झाला होता. या कारचा नंबर MP09 WC 4736 असा होता. तर MP07 GA 2499 हा टँकरचा नंबर होता. परंतु या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रूग्णालयात दाखल केले असता, त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, या गंभीर अपघाताची पोलीस पुढील चौकशी करत आहेत.