bus accident in meghalaya

मेघालयमध्ये(Meghalaya) प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळल्यामुळे भीषण अपघात(Bus Falls Into River At Meghalaya) झाला आहे. या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू (6 Death In Accident At Meghalaya)झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    मेघालयमध्ये(Meghalaya) प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळल्यामुळे भीषण अपघात(Bus Falls Into River At Meghalaya) झाला आहे. या अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू (6 Death In Accident At Meghalaya)झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस बुधवारी रात्री १२ वाजता नोंगच्राममधील रिंगडी नदीत कोसळली. यावेळी, अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तातडीने बचाव पथक आणि आपत्कालीन सेवा दल दुर्घटनास्थळी दाखल झालं. या बचाव कार्यादरम्यान, आतापर्यंत ४ मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून २ मृतदेह अजूनही बसमध्येच असल्याची माहिती समोर येत आहे. या मृतांमध्ये बस चालकाचा देखील समावेश आहे.

    मेघालयातील अपघात झालेल्या या बसमध्ये किमान २१ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तसेच १६ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. सध्या त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात नोंगश्रम पुलावर झाला. बस वेगात असल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसचा पुढचा भाग पुलाच्या कडांना आदळला आणि बस पाण्यात कोसळली.