old man on electric pole

माधा भाऊ गावात एक ६० वर्षीय वृद्ध विजेच्या(60 year old man climbs on electric pole) खांबावर चढला. त्याची मुलं त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होती(viru style protest) त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी हा वृद्ध विजेच्या खांबावर चढल्याची माहिती मिळाली आहे. पाच मुले आणि अनेक नातवंडे असलेल्या या ६० वर्षाच्या माणसाचे नाव सोब्रन सिंग असं आहे.

    शोले(sholay) चित्रपटात बसंतीशी लग्न करुन द्या या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढणारा विरू आपण सगळ्यांनी बघितला आहे.मात्र खऱ्या आयुष्यातला विरु तुम्ही कधी बघितला आहे का ? नाही ना. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यामधला हा विरू आहे. कुटुंबियांनी दुसऱ्या लग्नाला विरोध केला म्हणून त्याने चक्क विरू स्टाईल आंदोलन केले.

    माधा भाऊ गावात एक ६० वर्षीय वृद्ध विजेच्या खांबावर चढला. त्याची मुलं त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या विरोधात होती त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी हा वृद्ध विजेच्या खांबावर चढल्याची माहिती मिळाली आहे. पाच मुले आणि अनेक नातवंडे असलेल्या या ६० वर्षाच्या माणसाचे नाव सोब्रन सिंग असं आहे.

    मुलांनी आपलं दुसर्‍या लग्नासाठी तयार व्हाव म्हणून ते विजेच्या खांबावर चढले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोब्रन सिंग खांबावर चढल्यानंतर त्यांचे कुटुंबीय काळजीत पडले. त्यांनी इतरांना मदतीसाठी बोलावले. सिंग यांना खाली उतरायला सांगितले. कहर म्हणजे सिंग यांनी उच्च विद्युतदाब असलेली वायरही हातात धरली. लग्न करायला परवानगी द्या नाहीतर आत्महत्या करेन , अशी धमकीही दिली.

    सिंग यांच्या कुटुंबीयांनी विद्युत विभागाला याबाबत माहिती दिल्याने त्या पोलवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आल्या. एक तासांनी  गावातल्या लोकांनी सिंग यांना खाली उतरवले. सिंग यांच्या पत्नीचे ४ वर्षांपुर्वी निधन झाले होते. ते आता नव्या साथीदाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या आंदोलनानंतर घरच्यांचे मत बदलेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.