people gathered for Gujarat wedding

गुजरातमधील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री कांति गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो लोक गरब्यामध्ये(video of 6000 people playing garba) रमलेले दिसतात. कोरोनाबाबतीतले सगळे नियम धाब्यावर बसवल्याने गामित यांच्यावर टीका होताना दिसत आहे.

गुजरातमध्ये कोरोनाचे(gujrat corona) रुग्ण वाढत आहेत. गुजरात राज्यातील ४ मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. अशी परिस्थिती असताना राज्यात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री कांति गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचा एक व्हिडीओ व्हायरल(video viral) झाला आहे. या व्हिडिओमध्ये हजारो लोक गरब्यामध्ये(video of 6000 people playing garba at gamits granddauthers engagement) रमलेले दिसतात. कोरोनाबाबतीतले सगळे नियम धाब्यावर बसवल्याने गामित यांच्यावर टीका होताना दिसत आहे.


कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमांवर बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित यांनी सगळ्या नियमांना हरताळ फासला आहे. गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली असून गृह मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी व्हिडीओचा तपास करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनीही कांती गामित यांची चौकशी केली आहे.

कांती गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचे आयोजन तापीच्या डोसवाडा गावामध्ये करण्यात आले होते. या समारंभामध्ये ६००० हून अधिक लोक गरबा खेळताना दिसून आले. या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल होणार असून त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांवरही कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान पोलिसांनी मंगळवारी गामित यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांनी १५०० ते २००० लोकांना साखरपुड्यासाठी बोलावले होते.  मात्र इतर लोकांनाही माहिती मिळाल्याने मोठी गर्दी झाली.