7 km trek without water; Fortunately, the rain saved her grandmother's life

होरपळणाऱ्या उन्हात आजीसोबत पायी चालत जाणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानात घडली आहे. सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला आहे. मृत मुलीच्या आजीचे नाव सुखीदेवी असे आहे. ती आपल्या नातीसोबत राजस्थानातील रायपूर येथे गेली होती. तिथून सकाळी दोघीही जणी निघाल्या. सकाळी वातावरणात गारवा असल्याने त्या दोघींनी पायीच चालत जाण्याचे ठरविले.

    जयपूर : होरपळणाऱ्या उन्हात आजीसोबत पायी चालत जाणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलीचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची घटना राजस्थानात घडली आहे. सुदैवाने पाऊस पडल्याने तिच्या आजीचा जीव वाचला आहे. मृत मुलीच्या आजीचे नाव सुखीदेवी असे आहे. ती आपल्या नातीसोबत राजस्थानातील रायपूर येथे गेली होती. तिथून सकाळी दोघीही जणी निघाल्या. सकाळी वातावरणात गारवा असल्याने त्या दोघींनी पायीच चालत जाण्याचे ठरविले.

    10 ते 12 किलोमीटरचा प्रवास करून त्या दोघी चालत आल्या. दरम्यान, दुपारी ऊन डोक्यावर आल्याने दोघींना त्रास होऊ लागला. निघताना त्यांनी पाण्याची बाटलीसोबत घेतली नव्हती. जिथून त्या दोघींचा प्रवास सुरू होता, तो रस्ता वाळवंटातील कच्चा रस्ता होता. त्यामुळे पाणी मिळण्याची कोणतीही सोय तिथे उपलब्ध झाली नाही. अखेर तीव्र ऊन आणि पाण्याच्या अभावामुळे त्यांना त्रास असह्य झाला आणि त्या बेशुद्ध पडल्या.

    खूप वेळाने तिथून जाणाऱ्या एका गुराखी महिलेने त्यांना पाहिले आणि ताबडतोब गावच्या सरपंचांना फोन केला. सरपंच पोलिसांसह तिथे हजर झाले. त्या दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला असता मुलीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. सुदैवाने त्या दोघी बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळाने पावसाची हलकी सर येऊन गेल्याने आजीचा जीव वाचला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    हे सुद्धा वाचा