तिरुपती मंदिरातील ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

तिरुपती बालाजी मंदिर कोरोनाच्या महामारीमुळे १० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु भाविकांच्या आग्रहाखातर मंदिर सुरु करण्यात आले. सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. परंतु मंदिराच्या ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४०३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेश : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच लॉकडाऊन केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी केली होती. धार्मिक कार्यक्रम. मंदिरे आणि इतर सोहळ्यांना देखील बंदी घातली होती. जूनमध्ये अनलॉक दरम्यान काही अटी शीथिल करण्यात आल्या. तेव्हा तिरुपती मंदिर सुरु करण्यात आले. परंतु मंदिराच्या ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेत ३ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

तिरुपती बालाजी मंदिर कोरोनाच्या महामारीमुळे १० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु भाविकांच्या आग्रहाखातर मंदिर सुरु करण्यात आले. सर्व नागरिकांना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. परंतु मंदिराच्या ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४०३ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

तिरुपती मंदिर प्रशासनाने सांगितले आहे की, मंदिर सुरु करताना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व नियम पाळण्यात आले आहेत. सर्व भाविकांना सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यास बंधनकारक केले आहे. परंतु असे असले तरी काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. असे प्रशासनाने म्हटले आहे.