हैदराबादेतील प्राणी संग्रहालयात ८ सिहांना कोरोनाची लागण

RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी केलेली नाही. 

    हैदराबाद : देशात कोरोनाचा प्रकोप सुरु असताना पहिल्यांनाच प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये ८ आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे.  RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर एंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी केलेली नाही.

    CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील. त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरु करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    प्राणीसंग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का? याची माहिती मिळणार आहे.