dung stolen in chattisgad

छत्तीसगड (Chattisgad)पोलिसांना कोरबामधील एका गावातून ८०० किलो शेण चोरीला(800 Kilogram Dung Stolen) गेल्याची तक्रार मिळाली आहे. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे.

    छत्तीसगडमधील(Chattisgad) कोरबा जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगड पोलिसांना कोरबामधील एका गावातून ८०० किलो शेण चोरीला(800 Kilogram Dung Stolen) गेल्याची तक्रार मिळाली आहे. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे. दिपका पोलीस स्टेशन परिसरातील धुरेना गावात ८ ते ९ जून रोजी मध्यरात्री ८०० किलो शेण चोरीला गेले. त्याची किंमत सुमारे १६०० रुपये आहे. गोधन ग्रामिण समितीचे अध्यक्ष कमहनसिंग कंवर यांनी १५ जून रोजी ही औपचारिक तक्रार दाखल केली असल्याचे समजते.

    कमहनसिंग कंवर म्हणाले, अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचे निवेदनही घेतले आहे आणि  ग्रामस्थांचीही चौकशी केली आहे.

    छत्तीसगड सरकारने गांडूळ कंपोस्ट उत्पादनासाठी ‘गोधन न्याय योजना’ सुरू केली. त्याअंतर्गत शेण २ रुपये किलोच्या आधारे विकत घेतले जाते. ही योजना सरकारने २० जुलै रोजी हरेली उत्सवाच्या निमित्ताने सुरू केली होती. यामध्ये सुरुवातीला पशुपालकांकडून दीड रुपये प्रतिकिलो दराने शेण खरेदी करण्याची योजना होती.