82 teeth in young man's jaw; The doctor was shocked

पाटण्यातील आयजीआयएमएसमध्ये त्याच्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याच्या जबड्यातील ट्युमर बाहेर काढण्यात आला. त्यात तब्बल 82 दात होते.रुग्णालयातील डॉ. मनीष मंडल यांनी सांगितले, आरा जिल्ह्यातील 17 वर्षांचा नितीश कुमार 5 वर्षांपासून कॉम्प्लेक्स ओडोन्टोम या जबड्याच्या दुर्मीळ ट्युमरने ग्रस्त होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही त्याची ही समस्या दूर झाली नाही. योग्य उपचार न मिळाल्याने तो या रुग्णालयात आला होता. त्याचवेळी टेस्ट केल्यावर त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा दुर्मिळ ट्युमर असल्याचे निदान झाले.

    पाटणा : आपणा सर्वांनाच माहीत आहे की, आपल्या तोंडात किती दात असतात? कुणीही याचे 32 असे सहजपणे उत्तर देतील. परंतु एका तरुणाच्या तोंडातून 32 नाही तर तब्बल 82 दात काढले आहेत. या तरुणावर पाटण्यामध्ये यशस्वी सर्जरी करण्यात आली. नितीश कुमार असे या 17 वर्षीय रुग्णाचे नाव असून गेल्या पाच वर्षांपासून त्याला ‘कॉम्प्लेक्स ओडोन्टोम’ हा जबड्याचा एक दुर्मीळ ट्युमर होता. ज्यामुळे त्याला अनेक अडचणी येत होत्या.

    पाटण्यातील आयजीआयएमएसमध्ये त्याच्यावर यशस्वी सर्जरी करण्यात आली. सर्जरी करून त्याच्या जबड्यातील ट्युमर बाहेर काढण्यात आला. त्यात तब्बल 82 दात होते.रुग्णालयातील डॉ. मनीष मंडल यांनी सांगितले, आरा जिल्ह्यातील 17 वर्षांचा नितीश कुमार 5 वर्षांपासून कॉम्प्लेक्स ओडोन्टोम या जबड्याच्या दुर्मीळ ट्युमरने ग्रस्त होता. अनेक ठिकाणी उपचार घेऊनही त्याची ही समस्या दूर झाली नाही. योग्य उपचार न मिळाल्याने तो या रुग्णालयात आला होता. त्याचवेळी टेस्ट केल्यावर त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा दुर्मिळ ट्युमर असल्याचे निदान झाले.

    देशातील ही अशी पहिलीच घटना आहे. त्यामुळे सुरुवातीला डॉक्टरही हैराण झाले होते. मात्र, त्यांनी नितीश कुमारवर यशस्वी सर्जरी केला. आता नितीश बरा आहे. त्याच्या दोन्ही गालाच्या खालच्या बाजूला आणि मानेच्या वर दोन्ही दिशेने असे हे ट्युमर होते. डॉ. प्रियंकर सिंह आणि डॉ. जावेद इकबाल यांनी सांगितले की, जबड्याचा हा एक असामान्य असा ट्युमर आहे. हा ट्यूमर होण्याचे कारण म्हणजे आनुवंशिक किंवा जबड्याला हानी पोहोचल्यामुळे जबडा किंवा दातांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यानेही होऊ शकतो.