15 वर्षाच्या मुलाने मोबाईल हॅक करून उकळले पैसे

सिंगरौलीचे पोलिस अधीक्षक वीरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे 15 वर्षांच्या मुलाने सिंगरौलीत बसून स्वत:चे लोकेशन युएई असल्याचे दाखविले. त्यानतंर भारतात बंदी असलेली अ‍ॅप्स त्याने डाऊनलोड करून घेतली. नंतर मुलगी बनून व्हॉटसअ‍ॅपवर लोकांसोबत चॅटिंग केले. त्यातून समोरच्या व्यक्तींचे मोबाईल हॅक करून खासगी डेटा गोळा केला. त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. एका तरुणाने पोलिसात तक्रार दिली की, प्रियांका नावाची मुलगी त्याला ब्लॅकमेल करत असून पैशांची मागणी केली जात आहे. तसेच त्या तरुणाने असेही सांगितले की, शेजारी राहणारा मुलगा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्याकडून डेटा पसरविणे थांबवत होता. मात्र आता ते शक्य नसल्याचे तरुणाने सांगितले.

    दिल्ली : सध्या भारतात पेगॅससवरून पाळत ठेवल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेशात एका 15 वर्षाच्या मुलाने हॅकिंगच्या माध्यमातून लोकांचा डेटा चोरी करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंगरौलीमध्ये हा प्रकार घडला असून पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. सिंगरौलीमध्ये बसलेल्या या मुलाने आपले लोकेशन युएई असल्याचे सांगून भारतात बंदी असलेली अ‍ॅप्स डाऊलोड केली होती. त्यातून त्याने काही लोकांचे मोबाईल फोन हॅक केले. त्यानंतर खासगी माहिती चोरून लोकांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

    सिंगरौलीचे पोलिस अधीक्षक वीरेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे 15 वर्षांच्या मुलाने सिंगरौलीत बसून स्वत:चे लोकेशन युएई असल्याचे दाखविले. त्यानतंर भारतात बंदी असलेली अ‍ॅप्स त्याने डाऊनलोड करून घेतली. नंतर मुलगी बनून व्हॉटसअ‍ॅपवर लोकांसोबत चॅटिंग केले. त्यातून समोरच्या व्यक्तींचे मोबाईल हॅक करून खासगी डेटा गोळा केला. त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले. एका तरुणाने पोलिसात तक्रार दिली की, प्रियांका नावाची मुलगी त्याला ब्लॅकमेल करत असून पैशांची मागणी केली जात आहे. तसेच त्या तरुणाने असेही सांगितले की, शेजारी राहणारा मुलगा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्याकडून डेटा पसरविणे थांबवत होता. मात्र आता ते शक्य नसल्याचे तरुणाने सांगितले.

    पोलिसांनी याप्रकरणी सायबर एक्सपर्टचा सल्ला घेतला. तेव्हा अशी माहिती समजली की, जो मुलगा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्याचा डेटा पसरविणे थांबवत होता तोच महिला बनून ब्लॅकमेल करत आहे. त्यानंतर पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली. भारतात बंदी असलेल्या अ‍ॅपला एका थर्ड पार्टी अ‍ॅपच्या माध्यमातून डाऊनलोड केले होते. त्यावर खोटे व्हॉटसअ‍ॅप अकाउंट तायर करून अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. लोकांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैशांच्या मागणी करायचा. त्याच पैशांमधून त्याने डार्कवेबच्या माध्यामातून हॅकिंग सॉफ्टवेअरसुद्धा विकत घेतले होते.