आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचे एक मोठे पाऊल, स्वामित्व योजनेंतर्गत संपत्ती कार्डमुळे होणार ‘हे’ फायदे

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'स्वामित्व योजना' (Swamitva Yojana) लॉन्च केली. या योजनेंतर्गंत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) वितरित करण्यात येणार आहे. या योजनेनुसार जवळपास १ लाख जमीन मालकांना त्यांच्या मोबाईलवर एमएमएस (SMS) येणार असून यावरील लिंकद्वारे ते त्यांचे संपत्ती कार्ड डाऊनलोड (Card Download) करू शकणार आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘स्वामित्व योजना’ (Swamitva Yojana) लॉन्च केली. या योजनेंतर्गंत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) वितरित करण्यात येणार आहे. या योजनेनुसार जवळपास १ लाख जमीन मालकांना त्यांच्या मोबाईलवर एमएमएस (SMS) येणार असून यावरील लिंकद्वारे ते त्यांचे संपत्ती कार्ड डाऊनलोड (Card Download) करू शकणार आहेत.

ज्या राज्यांतील हे जमीनधारक असतील त्यांना ती राज्ये कागदोपत्री सर्टिफिकिट देणार आहेत. या योजनेतून ६ राज्यांतील ७६३ गावांचे लोक लाभधारक असणार आहोत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश ३४६, हरियाणा २२१, महाराष्ट्र १००, मध्य प्रदेश ४४, उत्तराखंड ५० आणि कर्नाटकचे २ गाव सहभागी असणार आहेत. केंद्र सरकारने ज्या लोकांना संपत्ती कार्ड अथवा प्रॉपर्टी कार्ड दिले आहे, अशा लोकांशीही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, आता आपल्या संपत्तीकडे कुणीही वाकडी नजर टाकू शकणार नाही.

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये दुसऱ्या दिवशीच संपत्ती कार्ड दिले जाणार आहे. तर महाराष्ट्रात जमीनधारक लाभार्थ्यांना हे कार्ड मिळण्यास १ महिना लागण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र सरकारी संपत्ती कार्डसाठी सामान्य शुल्क आकारणार आहे. यामुळे हे शुल्क निश्चिती आणि त्याचे विवरण यासाठी हा वेळ लागणार आहे.

 संपत्ती कार्डमुळे होणार असे फायदे 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही योजना म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. यामुळे गावाकडे राहणाऱ्या आपल्या भावा-बहिणींना आत्मनिर्भर होण्यास मोठी मदत होईल. देशाच्या विकासात, जमीन आणि घरावरील मालकी हक्काची मोठी भूमिका असते. जेव्हा, संपत्तीचे रेकॉर्ड असते आणि संपत्तीवर अधिकार असतो, तेव्हा लोकांत आत्मविश्वास निर्माण होतो.

संपत्तीचे रेकॉर्ड असते तेव्हा गुंतवणुकीसाठी दरवाजे खुले होतात. संपत्तीचे रेकॉर्ड असेल, तर बँकांकडूनही सहजपणे कर्ज मिळते आणि रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे मार्गही निर्माण होतात. संपत्ती कार्ड मिळाल्याने त्यांना सामाजिक आणि आर्थिक बळकटी मिळाली आहे. तसेच गावातील त्यांच्या संपत्तीचे वादही कमी होतील.