लय भारी ! एका जोडप्यानं अनोख्या पद्धतीने साजरा केला लग्नाचा वाढदिवस ; व्हिडिओ पाहून म्हणालं, जे बात…

नेकदा आपल्या जोडीदाराला सरप्राईज (Surprise) देण्यासाठी महिला आणि पुरूष काही हटके करता येईल का याचा विचार करतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याचा (Couple) व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत आहे. लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कुटूंबासह साजरा केला आहे.

आपला लग्नाचा वाढदिवस (Wedding anniversary ) खास असावा यासाठी सगळेचजण वेगवेगळे प्लॅन्स (Plans) करतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. अनेकदा आपल्या जोडीदाराला सरप्राईज (Surprise) देण्यासाठी महिला आणि पुरूष काही हटके करता येईल का याचा विचार करतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याचा (Couple) व्हिडिओ व्हायरल (Video Viral)  होत आहे. लग्नाचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण कुटूंबासह साजरा केला आहे.

दक्षिण भारतातील जोडप्याने व्हिडिओच्या माध्यमातून लग्नानंतरचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. फुलांच्या साहाय्याने जमिनीवर वर्ष दर्शवण्यासाठी रांगोळी काढली आहे. एक- एक पाऊल पुढे जात आपला जीवनप्रवास दाखवत आहेत. जसजसं वर्ष पुढे जात आहेत. तसतसं त्यांना कुटूंबातील एक-एक व्यक्ती जोडली जात आहे.


आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोकांना ही भन्नाट आयडीया आवडली असून त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.