Rajasthan: A couple gets married at Kelwara Covid Centre in Bara, Shahbad wearing PPE kits

राजस्थान : नटून थटून नाय तर PPE किट घालून नवरी आली लग्न मंडपात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. राजस्थानमध्ये झालेल्या या अनोख्या लग्न सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

राजस्थानमधील बारा जिल्ह्यातील कोवीड सेंटरमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. लग्नादिवशीच नवरीची कोरोना चाचणी  पॉझिटिव्ह आली. मात्र, विवाह सोहळा रद्द न करता सरकारी नियमावलीनुसार हे लग्न झाले.

चार पाच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ झाला. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत फक्त नवरीच नाही तर नवरदेवाने देखील PPE किट घातलेला दिसत आहे. भटजी देखील PPE किट घालूनच लग्न लावत आहे.