Owner commits suicide after seeing missing dogs body

जम्मू काश्मीरमधील बडगावमध्ये एका सीआरपीएफ जवानानं आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. या जवानाचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. याची कल्पना असल्यामुळे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्या जवानाकडे कुठलंही शस्त्र न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो निशस्त्र होता. मात्र त्याने अचानक सहकाऱ्याच्या हातातील बंदूक ओढून घेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला.

    शारीरिक आरोग्याइतकाच मानसिक आरोग्य हा घटकही महत्त्वाचा असतो. मानसिक आरोग्य बिघडलं तर शारिरिकदृष्ट्या तंदुरुस्त माणसंही भलतासलता निर्णय घेतात. मानसिक आरोग्य वेळीच सुधारलं नाही, तर त्याचे विपरित परिणाम होत असतात. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे एका जवानाने नुकतेच आपले प्राण गमावले.

    जम्मू काश्मीरमधील बडगावमध्ये एका सीआरपीएफ जवानानं आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. या जवानाचं मानसिक आरोग्य बिघडलं होतं. याची कल्पना असल्यामुळे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्या जवानाकडे कुठलंही शस्त्र न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो निशस्त्र होता. मात्र त्याने अचानक सहकाऱ्याच्या हातातील बंदूक ओढून घेत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला.

    या जवानाची मनोवस्था ठिक नव्हती आणि गेल्या काही दिवसांपासून तो सुट्टीवर होता. नुकताच तो सुट्टीवरून कर्तव्यावर परतला होता. मात्र तरीही त्याचं मानसिक आरोग्य ठिक नसल्याचं लक्षात आलं होतं. असं असलं तरी तो एवढा टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणालाच अपेक्षा नव्हती. त्यानं अचानक सहकाऱ्याच्या बंदुकीची स्वतःची जीवनयात्रा संपवल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

    हा जवान मूळचा केरळ राज्यातील असल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर जवानाचं पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे. मात्र या घटनेच्या निमित्तानं सर्वच क्षेत्रातील मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विशेषतः तणावाच्या परिस्थितीत काम करणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.