A disgusting spice factory at Agra in Uttar Pradesh; The donkey's feces were mixed with fake spices

गाढवाचे मल (donkey dung), आम्ले (acid), खाण्यायोग्य नसलेला रंग आणि भुसा (hay) वापरुन हे मसाले तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. ३०० किलोपेक्षा जास्त बनावट मसाले पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच बनावट तिखट, कोथिंबीर पूड आणि हळदही जप्त करण्यात आली आहे.

आग्रा : रेडीमेड मसाल्यामुळे गृहिणींचे काम सोप्पे झाले आहे. मात्र, रेडिमेड मसाले वापरणाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. ब्रँडेड मसाला कंपन्यांची अनब्रँडेड भेसळ उघडकीस आले आहे. गाढवाचे मल मिसळून बनावट मसाले तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशात हा मसाल्याचा किळसवाणा कारखाना सुरु होता.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी (Police) सोमवारी रात्री हाथरस (Hathras) येथील एका कारखान्यावर धाड टाकल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्थानिक ब्रँड्सचे मसाले (local brands spices) या कारखान्यात तयार होत होते.

गाढवाचे मल (donkey dung), आम्ले (acid), खाण्यायोग्य नसलेला रंग आणि भुसा (hay) वापरुन हे मसाले तयार केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

३०० किलोपेक्षा जास्त बनावट मसाले पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच बनावट तिखट, कोथिंबीर पूड आणि हळदही जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी कारखान्याचा मालक (factory owner) अनूप वार्शने (Anoop Varshney) याला अटक (arrested) करण्यात आली आहे. बनावट मसाल्यांचे  २७ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगीतले.