श्रीनगर हायवेवरच्या टोलनाक्यावर दहशतवाद्यांचा खात्मा, पाहा एन्काऊंटरचा लाईव्ह व्हिडिओ

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर महामार्गावर गुरुवारी चार दहशतवादी एका गाडीतून प्रवास करत होते. टोलनाक्यावर सुरक्षा यंत्रणांनी ही गाडी थांबवली आणि चौघांकडं ओळखपत्राची विचारणा केली. मात्र त्यानंतर या चौघांनी शस्त्रास्त्रं बाहेर काढताच सुरक्षा यंत्रणांनीही गोळीबार सुरू केला. त्यानंतर बराच काळ ही चकमक सुरू होती.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर हायवेवरच्या टोलनाक्यावर सुरक्षा यंत्रणांनी एक गाडी थांबवली. त्यानंतर या चकमकीचा सुरुवात झाली. या गाडीत चार दहशतवादी होते. ताज्या माहितीनुसार या चारही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलंय.

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर महामार्गावर गुरुवारी चार दहशतवादी एका गाडीतून प्रवास करत होते. टोलनाक्यावर सुरक्षा यंत्रणांनी ही गाडी थांबवली आणि चौघांकडं ओळखपत्राची विचारणा केली. मात्र त्यानंतर या चौघांनी शस्त्रास्त्रं बाहेर काढताच सुरक्षा यंत्रणांनीही गोळीबार सुरू केला. त्यानंतर बराच काळ ही चकमक सुरू होती.

या घटनेनंतर श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. या रस्त्यावरील वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. या भागातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं या घटनेचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओत टोल नाक्यावरचा सन्नाटा आणि त्यातून येणारे गोळ्यांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतायत.

याअगोदर बुधवारीदेखील पुलवामामध्ये काही दहशतवादी सक्रीय असल्याच्या घटना घडल्या होत्या. पुलवामातील काकापोरा चौक या ठिकाणी दहशतवादयांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यात १२ नागरिक जखमी झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ग्रेनेडचा नेम चुकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. मात्र तरीही ग्रेनेडचे छर्रे लागून १२ जण जखमी झाले होते.