घराला बाहेरुन कुलूप पण आतमध्ये… स्फोटानंतर पाच मृतदेह पाहून पोलिसही हादरले

    बिजनौर : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एका फटाका कारखान्यात ठेवलेल्या ज्वलनशील पदार्थाचा विस्फोट झाल्यामुळे तेथे काम करणाऱ्या 5 मजुरांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कारखाना संचालकाला अटक करण्यात आले आहे.

    जिल्ह्याच्या बख्शीवाला गावांत एकांतात असलेल्या युसुफ नावाच्या व्यक्तीच्या घरातील खोलीत फटाके बनविण्याचे काम सुरू होते. 9 मजूर तेथे फटाके बनविण्यासाठी काम करीत असताना फटाक्याच्या दारूला आग लागल्यामुळे ती खोलीत पसरली व मजुरांचा मृत्यू झाला.

    युसूफ नामक एका युवकाच्या घरात हा स्फोट झाला. या घरात अवैधरित्या फटाक्यांची निर्मिती होत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटात संपूर्ण घरच उद्ध्वस्त झाले आहे. घराला बाहेरुन कुलूप लावून आत फटाके निर्मितीचे काम केले जात होते, अशी धक्कादायक माहितीही तपासात उघड झाली आहे.