A man weaving a thread in a needle with his eyes closed

सुईत धागा ओवण्याचे काम भल्याभल्यांना जेरीला आणत असते. मात्र, गुजरातच्या भावनगरमध्ये राहणारा पंधरा वर्षांचा जीत त्रिवेदी नावाचा मुलगा हे काम बंद डोळ्यांनी करतो. इतकेच नव्हे तर डोळ्यांवर पट्टी बांधून लेखन-वाचन, ड्रायव्हिंग, पेंटिंग ही कामेही तो लिलया करतो. त्याचे डोळे आहेत की ‘एक्स-रे’ असा प्रश्‍न अनेकांना पडतो.

    अहमदाबाद :  सुईत धागा ओवण्याचे काम भल्याभल्यांना जेरीला आणत असते. मात्र, गुजरातच्या भावनगरमध्ये राहणारा पंधरा वर्षांचा जीत त्रिवेदी नावाचा मुलगा हे काम बंद डोळ्यांनी करतो. इतकेच नव्हे तर डोळ्यांवर पट्टी बांधून लेखन-वाचन, ड्रायव्हिंग, पेंटिंग ही कामेही तो लिलया करतो. त्याचे डोळे आहेत की ‘एक्स-रे’ असा प्रश्‍न अनेकांना पडतो.

    जीतने डोळ्यांवर पट्टी बांधून लडाखच्या लेहपासून खार दुंग ला पर्यंतचे सुमारे 40 किलोमीटरचे अंतर स्कूटर चालवून पार केले होते. त्याला अगदी लहान वयापासूनच डोळे बंद करून अशा अनेक करामती करून दाखवण्याचा छंद आहे. त्याचे शिक्षक भरत पटेल यांनी सांगितले की, वेगवेगळ्या प्रकारच्या सरावामुळे त्याला हे सर्व शक्य होते.

    डोळ्यांवर पट्टी असतानाही त्याला समोरील हालचाली आणि वस्तूंबाबतचा आभास अचूकपणे होत असतो. अर्थातच हे अफलातून कौशल्य आहे. तो पट्टी बांधून एखाद्या वेळी लिहूही शकेल, पण वाचतो कसा हे न उलगडलेले कोडे आहे.