प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी यूपीएल-5 प्लांटमध्ये सोमवारी मध्यरात्री दोन स्फोट झाले. यामध्ये 24 कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

    अहमदाबाद (Ahmadabad).  गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील झगडियामध्ये असलेली केमिकल कंपनी यूपीएल-5 प्लांटमध्ये सोमवारी मध्यरात्री दोन स्फोट झाले. यामध्ये 24 कर्मचारी जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सीएम नावाच्या प्लांटमध्ये हा स्फोट झाला.

    स्फोट इतका मोठा होता की, 15 किलोमीटरपर्यंतच्या परिसरातील गावांमध्ये भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि लोक घरातून बाहेर पडले. स्फोटाचे कारण अस्पष्ट असून 24 जखमींवर भरूच आणि बडोदामधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.