minor girl burned alive

ही घटना बलदेरी पोलिस स्टेशन परिसरातील तुंदारसा माजरेच्या अंगार गावची आहे. गावचे रहिवासी पत्रकार प्रदीपसिंग यांची मुलगी श्रद्धा सिंह तिच्या दारात असलेल्या नळावर पाणी भरत होती. त्याचवेळी आरोपी सुभाष, महंत, जयकरण येथे पोहोचले आणि हात, तोंड व पाय बांधून मुलीवर रॉकेलची फवारले.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर कारागृहात (Jail) बंद असलेल्या पत्रकार (Reporter) प्रदीपसिंग यांची मुलगी सोमवारी काही लोकांना पळवून (Kidnaped) नेण्यात आले. यानंतर त्यांच्या दारापुढे मुलीवर रॉकेल टाकून जाळण्यात (minor girl was burnt alive)  आले आणि गुंड फरार झाले. घटनेनंतर तीन तासांनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर थोड्या वेळातच किशोरवयीन मुलीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी तिला उपचारांसाठी लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे. ही घटना जमीनीच्या वादातून घडली आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर लोकांनी पोलिसांवर (police) प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय आहे प्रकरण

ही घटना बलदेरी पोलिस स्टेशन परिसरातील तुंदारसा माजरेच्या अंगार गावची आहे. गावचे रहिवासी पत्रकार प्रदीपसिंग यांची मुलगी श्रद्धा सिंह तिच्या दारात असलेल्या नळावर पाणी भरत होती. त्याचवेळी आरोपी सुभाष, महंत, जयकरण येथे पोहोचले आणि हात, तोंड व पाय बांधून मुलीवर रॉकेलची फवारले.

त्यानंतर या मुलीला आग लावून घटनास्थळावरुन पळ काढला. आगीनंतर मुलीने ओरडल्यावर लोकांनी तिला मदत केली. कुटुंबीयांनी तिला सीएचसी धनपतगंज येथे आणले. अल्पवयीन मुलगी ९० टक्के जळाली होती. डॉक्टरांनी मुलगी गंभीर भाजलेल्या अवस्थेत असल्याने ट्रॉमा सेंटर लखनऊ येथे नेण्यास सांगितले. खुनाच्या क्रूर प्रयत्नाकडे दुर्लक्ष करून पोलिस तीन तासांनंतर घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.