पेन्शन चेक करण्यासाठी वृद्ध व्यक्ती पोहोचली बँकेत, खात्यावरील पैसे पाहून बसला जबरदस्त झटका, सरकारकडून केली ‘ही’ मागणी

मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एका वृद्ध व्यक्तीच्या खात्यात ५२ कोटी रूपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. इतकी मोठी रक्कम अचानकपणे खात्यामध्ये कशी जमा करण्यात आली. याबाबत आता सर्वत्र परिसरात चर्चा रंगली आहे. हसू की रडू अशा प्रकारची परिस्थिती त्या व्यक्तीसोबत निर्माण झाली आहे.

    बिहारमध्ये अचानक काही लोकांच्या बँक खात्येमध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. अचानकपणे बँक खात्यामध्ये मोठ-मोठी रक्कम पाठवली जात आहे. कटिहार प्रकरणाची चर्चा अजून संपलेली नव्हती की, मुझफ्फरपूर जिल्ह्यातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. पेन्शन चेक करण्यासाठी वृद्ध व्यक्ती बँकेत पोहोचली असता खात्यावरील पैसे पाहून त्या व्यक्तीला जोर का झटका बसला आहे.

    मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एका वृद्ध व्यक्तीच्या खात्यात ५२ कोटी रूपयांपेक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत. इतकी मोठी रक्कम अचानकपणे खात्यामध्ये कशी जमा करण्यात आली. याबाबत आता सर्वत्र परिसरात चर्चा रंगली आहे. हसू की रडू अशा प्रकारची परिस्थिती त्या व्यक्तीसोबत निर्माण झाली आहे.

    वृद्द व्यक्तिच्या खात्यामध्ये अचानक ५२ कोेटींपेक्षा जास्त रक्कम

    मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कटरा ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. एक वृद्ध व्यक्ती आपली पेन्शन चेक करण्यासाठी बँकेत गेला होता. तिथे त्याने सीएसपीच्या संचालकाकडून आपल्या पेन्शनबाबत माहितीची विचारणा केली. त्यानंतर सीएसपी संचालकाने त्या व्यक्तीचा आधार कार्ड आणि खात्यातील पैसे चैेक करण्यासाठी सही म्हणून अंगठा घेतला. मात्र, पैसे चेक करताना सीएसपी चक्कीत झाला. कारण वृद्द व्यक्तिच्या खात्यामध्ये अचानक ५२ कोेटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाली होती.

    सरकारकडून केली ‘ही’ मागणी

    वृद्ध व्यक्तीचा मुलगा सुजीत कुमारने या प्रकरणावर सांगितलं की, माझ्या वडिलांच्या खात्यावर ५२ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. खात्यातील पैसे पाहून आम्ही सर्वजण दंग झाले आहोत. आम्ही सर्व शेती करतो. त्यामुळे सरकारकडे माझी हीच मागणी आहे की, सरकारकडून आमच्या कुटुंबियांना थोेडीफार मदत केली जावी. तसेच आमचं कुटुंब गरीब असून आम्ही एक शेतकरी बांधव आहोत.