प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एका महिलेने बलात्काराचा (Rape Case) प्रयत्न करणाऱ्या आणि वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीची चाकू भोसकून हत्या (Murder)  केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील गुना (Guna) जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे.

 गुना : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एका महिलेने बलात्काराचा (Rape Case) प्रयत्न करणाऱ्या आणि वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीची चाकू भोसकून हत्या (Murder)  केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यातील गुना (Guna) जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. ही महिला या कथीत आरोपीच्या जाचामुळे एवढी कंटाळली होती की तीने आरोपीला चाकूने २५वेळा भोसकून त्याची हत्या केली. एक युवक गेल्या १५ वर्षांपासून आपल्यावर अत्याचार करत असल्याचा आरोप पीडित आरोपी महिलेने केला आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्यापासून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात येत होता. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बृजभूषण शर्मा असून तो अशोक नगर येथील रहिवासी आहे. याच भागात आरोपी महिलाही राहत होती. पीडित आरोपी महिला १६ वर्षाची होती, तेव्हा बृजभूषण याने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले होते. त्यानंतर, सातत्याने धमकी देऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवले. अखेर, बृजभूषणपासून सुटका होण्यासाठी पीडित महिलेने एका शिक्षकाशी लग्न केले. लग्नानंतर महिलेला एक मुलगीही झाली, मात्र बृजभूषण तिला वारंवार धमकी देत होता. तसेच, शरीर सुखाची मागणीही करत होता.

दरम्यान, हत्या घडलेल्या दिवशी पीडित आरोपी महिला घरी एकटीच होती. ही, संधी साधून बृजभूषण तिच्या घरी आला, तो दारुच्या नशेत होता. त्याने महिलेवर जबरदस्ती केली. अखेर, संयमाचा बांध तुटल्यामुळे पीडित महिलेने बृजभूषणची चाकू मारुन हत्या केली. जोपर्यंत युवकाचा खून होत नाही, तोपर्यंत महिलेने चाकूने वार केले, जवळपास २५ वेळा चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर, महिलेने स्वत: पोलीस स्टेशनला फोन करुन हत्येसंबंधी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी मृत युवकाचे शरीर नग्नावस्थेत होते. याप्रकरणी आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.