भंगारात विकत घेतलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी ; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण

हेलिकॉप्टर्सची खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याचं नाव मिठ्ठू असे असून , ते पंजाबमधील प्रसिद्ध भंगार विक्रेते असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिक सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्या मिठठुला आनंद व्यक्त केला आहे

    मानसा: पंजाबच्या मानसामधील एका भंगारवाल्यानं भंगारात चक्क हवाई दलाच्या तीन हेलिकॉप्टरची बोली लावून खरेदी केली आहे. या प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन आहे. भंगारवाल्यानं एकूण ६ हेलिकॉप्टर खरेदी केली होती. मात्र त्यातील एक मुंबईतील एका व्यक्तीनं खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर लुधिनायातील एका हॉटेल व्यवसायिकानं खरेदी केली. उर्वरित तीन हेलिकॉप्टर मानसमध्ये उभी करण्यात आली आहेत.
    मात्र मानासमध्ये उभारण्यात आलेली भंगारामधील हेलिकॉप्टर नागरिकांच्या आकर्षणाचं विषय ठरत आहेत. हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. अनेक जण इथे येऊन हेलिकॉप्टरसोबत फोटो काढत आहेत.
    हेलिकॉप्टर्सची खरेदी करणाऱ्या भंगारवाल्याचं नाव मिठ्ठू असे असून , ते पंजाबमधील प्रसिद्ध भंगार विक्रेते असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिक सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्या मिठठुला आनंद व्यक्त केला आहे. हवाई दलानं वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्यानं आनंद व्यक्त केला.