रेल्वे स्टेशनवर आलेल्या पार्सलमधून येऊ लागला विचित्र आवाज, प्रवाश्यांची उडाली तारांबळ ; पार्सल उघडताच पुढे घडलं असं काही…

दरभंगा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीहून बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसनं काही पार्सल आले होते, हे ट्रेनमधून खाली घेऊन दरभंगा स्टेशनवरील प्लॅफॉर्म नंबर एकवर आणले जात होते. मात्र, यातील एक पार्सल खाली घेताच यातून मोठ्यानं आवाज येऊ लागले. यानंतर तिथे उपस्थित लोक आणि कामगार दूर जाऊन उभा राहिले. याची सूचना आरपीएफसोबतच जीआरपीला दिली गेली.

    दरभंगा :  सिकंदराबादहून दरभंगामध्ये १७ जून रोजी आलेल्या पार्सलमध्ये झालेल्या धमाक्यांनंतर शनिवारी पुन्हा एकदा स्टेशनवर एका घटनेनं भीतीचं वातावरण पसरलं. शनिवारी दिल्लीवरुन आलेल्या एका पार्सलमधून येणारे आवाज ऐकून सगळेच उपस्थित लोक घाबरून गेले. स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. याची माहिती लगेचच आरपीएफला देण्यात आली. यानंतर आरपीएफद्वारे बॉम्ब निकामी करणारं पथक बोलावून तपास करण्यात आला.

    दरभंगा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीहून बिहार संपर्क क्रांती एक्सप्रेसनं काही पार्सल आले होते, हे ट्रेनमधून खाली घेऊन दरभंगा स्टेशनवरील प्लॅफॉर्म नंबर एकवर आणले जात होते. मात्र, यातील एक पार्सल खाली घेताच यातून मोठ्यानं आवाज येऊ लागले. यानंतर तिथे उपस्थित लोक आणि कामगार दूर जाऊन उभा राहिले. याची सूचना आरपीएफसोबतच जीआरपीला दिली गेली.

    टीमनं पार्सलची तपासणी केली. पार्सलमध्ये काहीही धोकादायक वस्तू नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अमन कुमार झा या पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून ते पार्सल उघडून घेतलं. यानंतर समजलं, की मोबाईलच्या पार्ट्ससोबत यात ब्लूट्यूथ स्पीकर मागवलं गेलं होतं. दाब पडल्यानं स्पीकर ऑन झाला आणि याच्याच आवाजानं लोकांमध्ये गोंधळ उडाला.