
गोव्याला निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला धारवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी १७ महिला गोव्याला निघाल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली.
बंगळुरु : गोव्याला निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला धारवाडमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी १७ महिला गोव्याला निघाल्या असताना ही दुर्दैवी घटना घडली.
कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. एकूण १७ महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या.
गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात दहा जणींना प्राण गमवावे लागले. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अपघातात पाच महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.