प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

रतलाम :  राजस्थानच्या चित्तौडगडमधील उदयपूर-निंबाहेरा राज्य महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा ट्रेलर आणि क्रूझर कारमध्ये जोरदार टक्कर झाली. यामध्ये नवविवाहीत जोडप्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला.

सर्व मृतक रतलाममधील अक्याकला गावचे रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व लोक राजस्थानच्या सांवलिया सेठ दर्शनासाठी जात होते. ही घटना निंबाहेरा-उदयपूर महामार्गावरील निकुंभ पोलिस स्टेशन परिसरातील नपावली ग्रामपंचायतीच्या बावडी गावाजवळ घडली.

मंगळवाडहून निंबाहेराकडे जाणाऱ्या ट्रेलरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या क्रूझर वाहनाला धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त होता. अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या प्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. ट्रेलरमध्ये अडकलेले वाहन बाहेर काढण्यासाठी जेसीबीला बोलविण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने, क्रूझर बाहेर काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबरला वधू आणि वर दोघांचे लग्न झाले होते. दोन दिवसानंतर हा आनंद शोकात बदलला. ही घटना ऐकल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.