गुजरातमध्ये आता बनणार अनोखी गाढविणीच्या दुधाची डेअरी, दर ७००० रुपये लिटर

गुजरातच्या आनंद स्थित आनंद ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे डॉ. डी एन रंक यांनी दिलेल्या माहितीनुसार हलारी गाढवे घोड्यांपेक्षा आकाराने लाहन असतात परंतु, ते इतर गाढवांपेक्षा मोठे असतात. ते घोड्यांसारखेच दिसतात. गाढवांची ही प्रजाती गेल्या २०० वर्षांपासून हलारा परिसरात आढळून येते. राष्ट्रीयस्तरावर ओळख मिळाल्यानंतर या प्रजातींचे संरक्षण आणि त्यांच्या जिन्सच्या संवर्धनासाठीही मार्ग मोकळा होईल.

वडोदरा : गुजरातमध्ये आता आणखी एक नवी दुध डेअरी उभी राहत आहे. या डेअरीचे वैशिष्ट्ये म्हणजे यामद्ये केवळ गाढविणीचे दूध मिळणार आहे. गाढविणीच्या एक लिटर दुधासाठी तब्बल सात हजार रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. या हिशेबाने पाहिले तर हे जगातील सर्वात महागडे दुध ठरु शकते.

संरक्षण व संवर्धनाचा मार्ग मोकळा

गुजरातच्या आनंद स्थित आनंद ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे डॉ. डी एन रंक यांनी दिलेल्या माहितीनुसार हलारी गाढवे घोड्यांपेक्षा आकाराने लाहन असतात परंतु, ते इतर गाढवांपेक्षा मोठे असतात. ते घोड्यांसारखेच दिसतात. गाढवांची ही प्रजाती गेल्या २०० वर्षांपासून हलारा परिसरात आढळून येते. राष्ट्रीयस्तरावर ओळख मिळाल्यानंतर या प्रजातींचे संरक्षण आणि त्यांच्या जिन्सच्या संवर्धनासाठीही मार्ग मोकळा होईल.

दूध कशासाठी वापरतात?

गाढवीणीचे दुध हे अधिक पौष्टिक समजले जाते. या दुधात अँटी ऑक्सिडंट आणि इतर तत्त्व आढळतात. गाढविणीचे दूध शक्तीदायक, स्थिरता आणणारे, उष्ण किंचित आंबट व खारट असून रुक्ष आहे. त्याय स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते. सर्व प्रकारचे वातविकार, अर्धांगवात, पक्षाघात हे रोग या दुधाने बरे होतात.

हलारी प्रजातीची संख्या मोठी

गुजरातमध्ये हलारी प्रजातीची गाढवे आढळतात. गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये या गाढवांची संख्या मोठी आहे. केवळ ओझे वाहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पशुंना दूध देणाऱ्या पशूंच्या श्रेणीत टाकण्याचा आणि त्यापासून कमाईचा नवा मार्ग शोधण्याचा मार्ग गुजरात सरकारकडून केला जात आहे.

हरियाणामध्येही आहे प्रकल्प

राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राकडून हरयाणाच्या हिस्सारमध्ये गाढविणीच्या दुधावर एका प्रोजेक्टचीही सुरुवात करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस ने हलारी प्रजातीच्या गाढवांना न्या प्रजातीचा दर्जा दिला. गाढवांच्या इतर प्रजातींनाही हा दर्जा मिळालेला आहे. परंतु गुजरातमध्ये आढळलेली ही पहिलीच गाढवाची नवी प्रजात आहे.

परदेशात मोठी मागणी

जामनगर आणि देवभूमी द्वारका जिल्ह्याला हलारा क्षेत्र म्हटले जाते. १८,१७६ वर्ग किलोमीटर क्षेत्रात जवळपास १,११२ गाढवे आढळून येतात. परदेशातही या गाढवाच्या दुधाला मोठी मागणी आहे. या दुधापासून साबण, स्कीन जेल, आणि फेस वॉश बनवले जातात.