५ मुलींसह मातेची रेल्वेखाली आत्महत्या, दारुड्या पतीला वैतागून टोकाचा निर्णय, परिसरात हळहळ

दारुड्या पतीकडून होणारा छळ सहन होत नसल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. महिलेसोबत आत्महत्या केलेल्या मुलींचे वय १० ते १८ वर्षांदरम्यान होतं. ही घटना इतकी भीषण होती की मृतदेह रेल्वे ट्रॅकपासून ५० मीटरपर्यंत फेकले गेले होते. 

    छत्तीसगडमधील महासमुंद शहरात एका महिलेनं रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री या महिलेनं तिच्या ५ मुलींसह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी या सहाही जणांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे महासमुंद शहरात एकच खळबळ उडालीय.

    दारुड्या पतीकडून होणारा छळ सहन होत नसल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. महिलेसोबत आत्महत्या केलेल्या मुलींचे वय १० ते १८ वर्षांदरम्यान होतं. ही घटना इतकी भीषण होती की मृतदेह रेल्वे ट्रॅकपासून ५० मीटरपर्यंत फेकले गेले होते.

    पतीशी भांडण झाल्यानंतर टोकाचा निर्णय

    बेमचा या गावातील रहिवासी असणारी उमा साहू (वय ४५) हिचा पती केजराम हा दारुडा होता. त्याच्याशी बुधवारी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर त्या रागात उमा आपल्या मुलींना घेऊन घराबाहेर पडली. मुलगी अन्नपूर्णा (१८), यशोदा (१६), भूमिका (१४), कुमकुम (१२) आणि तुलसी (१०) यांच्यासमवेत ती रेल्वे ट्रॅककडे गेली. मिळालेल्या माहितीनुसार रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान या सर्वांनी एकत्रितपणे लिंक एक्सप्रेसखाली जीव दिला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह जवळ पडले होते. तर इतर दोन मुलींचे मृतदेह काही अंतरावर आढळून आले. सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत हे मृतदेह फेकले गेले होते. आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना या महिलेची ओळख पटवणे शक्य झाले.