काळीज हेलावणारी घटना, कचरा वेचता वेचता आईचा मृत्यू, लेकरू पाहत राहिलं आई उठण्याची वाट

गांधीनगर परिसरात एक महिला नेहमीप्रमाणं कचरा वेचण्याचं काम करत होती.  तिच्यासोबत तिचा ५ वर्षांचा लहान मुलगा होता. कचरा वेचता वेचता अचानक तिला वेदना होऊ लागल्या. त्या वेदना इतक्या असह्य होत्या, की काही कळायच्या आतच ती महिला कचऱ्यात कोसळली. आपल्या आईला काय झालंय, हे कळण्याचं त्या मुलाचं वयही नव्हतं. वेदनांनी तडफडणाऱ्या त्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.

    आयुष्य कुणाला कुठला प्रसंग दाखवेल, काही सांगता येत नाही. गुजरातच्या गांधीनगरमध्ये अशाच एका करूण घटनेनं सर्वांचं हृदय हेलावलं. हा प्रसंग घडला कचरा वेचणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत.

    गांधीनगर परिसरात एक महिला नेहमीप्रमाणं कचरा वेचण्याचं काम करत होती.  तिच्यासोबत तिचा ५ वर्षांचा लहान मुलगा होता. कचरा वेचता वेचता अचानक तिला वेदना होऊ लागल्या. त्या वेदना इतक्या असह्य होत्या, की काही कळायच्या आतच ती महिला कचऱ्यात कोसळली. आपल्या आईला काय झालंय, हे कळण्याचं त्या मुलाचं वयही नव्हतं. वेदनांनी तडफडणाऱ्या त्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.

    आपली आई उठेल या आशेने तो मुलगा तिच्या जवळ बसून होता. काही वेळाने तो रडायला लागला. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी त्या महिलेला हलवून पाहिले. त्यावेळी ती महिला मृत्यूमुखी पडल्याने नागरिकांच्या लक्षात आले. मरून पडलेली आई आणि तिच्या उठण्याची वाट पाहत बसलेलं बाळ ही घटना पाहून तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचं हृदय हेलावलं. नागरिकांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी या मातेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

    गांधीनगरमधील शनीमंदिराजवळ रामनाथ जोगी आणि मंजू देवी हे कष्टकरी दांपत्य त्यांच्या तीन मुलांसोबत राहत होतं. रामनाथ हे त्यांच्या मजुरीच्या कामाला निघून जात आणि त्यानंतर मंजूू देवी कचरा उचलण्याचं काम करत असत. नेहमीप्रमाणे शनिवारी मंजू देवी कचरा उचलत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडून त्यांचं निधन झालं.