
धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कारा झाल्याची धक्कादाय घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात घडली आहे. मालक बलात्कारा करत होता तरी ड्रायव्हर न थांबता कार चालवत राहिला असे पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
ग्वालियर : धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कारा झाल्याची धक्कादाय घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात घडली आहे. मालक बलात्कारा करत होता तरी ड्रायव्हर न थांबता कार चालवत राहिला असे पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
पीडित महिला ही आरोपीच्या कंपनीत कामाला होती. फॅक्टरीत काम करण्याच्या बहाण्याने आरोपी तिला घेवून बाहेर गेला. यावेळी प्रवासादरम्यान धावत्या कारमध्येच त्याने महिलेवर बलात्कार केला. मागे हा सर्व प्रकार सुरु असताना देखील ड्रायव्हर न थांबता कार चालवत राहिला असल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.
ड्रायव्हरने गाडी थेट मालकाने सांगीतलेल्या हॉटेवर थांबवली. यानंतर मालकाने हॉटेलमध्ये देखील बलात्कार केला. ड्रायव्हरने मालाकाला या गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप पिडीतीने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मालक आणि ड्रायव्हर दोघांना अटक केली आहे.