मोबाईल गेमपायी गमावला जीव, केलं ७५ हजारांचं कर्ज

छत्तीसगडमधील रायगड गावात एका १७ वर्षांचा मुलाला मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागलं. फ्री फायरिंग गेम खेळताना गेममधील बंदूक अपग्रेड करण्यासाठी तो वारंवार मित्राकडून पैसे उधार घेत राहिला. दरवेळी तो मित्राकडून पैसे घेऊन गेममधील बंदुकीचे नवनवे फिचर्स विकत घेऊन ती अपडेट करत असे. या नादात त्याने मित्राकडून ७५ हजार रुपये कर्ज घेतलं.

    मोबाईल गेम हा व्यसनाचाच एक प्रकार असल्याचं मानसतज्ज्ञ सांगत असतात. मोबाईल गेमच्या वेडापायी एका तरुणाला आपले प्राण गमावावे लागल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडलीय.

    छत्तीसगडमधील रायगड गावात एका १७ वर्षांचा मुलाला मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन लागलं. फ्री फायरिंग गेम खेळताना गेममधील बंदूक अपग्रेड करण्यासाठी तो वारंवार मित्राकडून पैसे उधार घेत राहिला. दरवेळी तो मित्राकडून पैसे घेऊन गेममधील बंदुकीचे नवनवे फिचर्स विकत घेऊन ती अपडेट करत असे. या नादात त्याने मित्राकडून ७५ हजार रुपये कर्ज घेतलं. मित्राने मागितल्यानंतर ते कर्ज तो फेडू शकला नाही. याचा राग येऊन त्या मित्राने लक्षेंद्र नावाच्या या तरुणाला दारू पाजून त्याचा गळा चिरला.

    लक्षेंद्र हा अल्पवयीन होता. त्याचे वडिल जम्मूमध्ये नोकरी करतात. तो आईसोबत रायगढमध्ये राहत असे. तो सतत मोबाईलमध्ये डोकं घालून बसायचा. आईला वाटायचं की तो अभ्यासच करत असेल. मात्र प्रत्यक्षात मोबाईल गेमनं त्याला चांगलंच पछाडलं होतं. एका वर्षात त्यानं गेमपायी मित्राकडून ७५ हजारांचं कर्ज घेतलं होतं. १० मार्च रोजी आरोपी चवन आणि लक्षेंद्र एकत्र होते. चवननं पैशांची मागणी केल्यानंतर लक्षेंद्रनं त्याला नकार दिला. याचा राग येऊन चवननं लक्षेंद्रची गळा चिरून हत्या केली.

    हत्येनंतर त्याने अपहरणाचा बनाव रचला. त्याने लक्षेंद्रच्या मोबाईलवरून स्वतःच्या मोबाईलवर एक मेसेज केला. लक्षेंद्रचं अपहरण झालं असून ५ लाख रुपये देण्याची मागणी त्यात करण्यात आली. याची पोलिस तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तपास केल्यानंतर लक्षेंद्र आणि चवन हेच एकत्र असल्याचं दिसून आलं. पोलिसी खाक्या दाखवताच चवननं तोंड उघडलं आणि प्रकार उघडकीस आला.