मुलांचे गुणांकन करण्यासाठी भन्नाट आयडिया; परीक्षेची प्रश्नपत्रिकासुद्धा विद्यार्थीच तयार करणार आणि…

वर्षभरापूर्वी देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि पाहता पाहता या विषाणूचे रौद्ररूप साऱ्यांनीच अनुभवले. सध्या या विषाणूची दुसरी लाट आली असून अनेकांना याचा परिणाम भोगावा लागला आहे. सर्वसामान्य क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक विभागावरही त्याचे पडसाद उमटले असून अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, काही ठिकाणी ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्येच आयआयटी गोवामधील एक पेपर चर्चेत आला आहे. सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी गोवाच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा सुरू आहे.

    पणजी : वर्षभरापूर्वी देशात कोरोना विषाणूने शिरकाव केला आणि पाहता पाहता या विषाणूचे रौद्ररूप साऱ्यांनीच अनुभवले. सध्या या विषाणूची दुसरी लाट आली असून अनेकांना याचा परिणाम भोगावा लागला आहे. सर्वसामान्य क्षेत्रांप्रमाणेच शैक्षणिक विभागावरही त्याचे पडसाद उमटले असून अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, काही ठिकाणी ऑनलाइन स्वरूपात परीक्षा घेण्यात येत आहेत. यामध्येच आयआयटी गोवामधील एक पेपर चर्चेत आला आहे. सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी गोवाच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा सुरू आहे.

    विशेष म्हणजे या काळात मुलांचे गुणांकन करण्यासाठी संस्थेने एक भन्नाट मार्ग शोधून काढला आहे. संस्थेने मुलांना त्यांचा पेपर स्वत:च काढायला सांगितला असून त्याची उत्तरदेखील लिहिण्यास सांगितली आहेत. मात्र, हा पेपर तयार करण्यासाठी संपूर्ण सेमिस्टरमध्ये मुलांनी जे शिकविण्यात आले त्याच आधारावर प्रश्न तयार करावे लागणार आहेत.

    चर्चेत आलेला पेपर 70 मार्गांचा असून हा पेपर दोन भागांमध्ये विभागला आहे. यापैकी 40 मार्कांच्या एका भागामध्ये विद्यार्थ्यांना स्वत: अभ्यासक्रमाच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यास सांगितली. यासाठी त्यांना 2 तास देण्यात आले होते. तर, दुसरा भाग 30 मार्कांचा असून यात विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यास सांगितले आहे. तसेच या परीक्षेच्या काळात मित्रपरिवारासोबत चर्चा करून प्रश्न काढण्यास सक्त मनाई आहे. जर, प्रश्नांमध्ये समानता आढळून आली तर त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणांवर होणार आहे.

    दरम्यान, या पेपरसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण पाठ्यपुस्तकाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. जर, सेमिस्टरमध्ये काय शिकवले हे विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर त्यांना पेपर काढता येणार नाही. म्हणूनच सध्या सोशल मीडियावर या अनोख्या परीक्षेची चर्चा रंगली आहे.