अबब…..  वीज बिलाचा आकडा पाहुन तुम्ही व्हाल थक्क

डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीला नियमितपणे वीज बिल हे १० ते २० हजार रुपयांच्या दरम्यान येते. मात्र यावेळी आलेल्या बिलाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.वीज देयकाच्या रकमेत ३,११,४१,५४०१५ हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली.

जयपूर: लॉकडाऊनच्या काळात वीजबीलांचे आकडेबघून अनेकाना धक्का बसला, यात गरीबा श्रीमंतपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वांचाच समावेश होता. काहींना कोट्यवधींचे बील आले तर काहींना शून्य रुपयांचेही बिल आहे. वीज वितरण महामंडाळाच्या लॉकडाऊनमधील या कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागला. असाच काहीस धक्का राजस्थानमधील भिलवाडा येथे असलेल्या डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीला बसला आहे. या कंपनीला नियमितपणे वीज बिल हे १० ते २० हजार रुपयांच्या दरम्यान येते. मात्र यावेळी आलेल्या बिलाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.वीज देयकाच्या रकमेत ३,११,४१,५४०१५ हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. बराच वेळ तर तो नेमका आकडा कळायलाच वेळ लागला. हे बिल भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत दिली आहे. अन्यथा यावर ५ कोटी ७५ लाखांचा दंड आकारण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

भिलवाडामधील डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीला गेल्या महिन्यात थोडं थोडकं नाही तर तब्बल ३ अब्ज ११ कोटी ४१ लाख ५४ हजार रुपयांचं बिलबाबत वीज वितरण कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी कॉम्प्युटरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे असे झाल्याचे त्यांनी सांगितले . अखेर नवीन बिल कंपनीला पाठवण्यात आले.