अभिनेता सिद्धार्थला धमक्या आणि शिव्यांचे ५०० पेक्षा जास्त फोन, सोशल मीडियावरून नंबर जाहीर, सिद्धार्थची भाजपवर टीका

सोशल मिडियावर फोन नंबर जाहीर केल्यानंतर आपल्याला धमकीचे ५०० पेक्षा अधिक फोन आल्याचं सिद्धार्थनं म्हटलंय. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांनाही धमकीचेे आणि अश्लिल भाषेत शिविगाळ करणारे फोन आल्याची तक्रार सिद्धार्थनं केलीय. यातील सर्वच्या सर्व कॉल आपण रेकॉर्ड केले असून त्याचा तपशील पोलिसांना दिल्याचंही त्यांनं सांगितलंय. 

    देशभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातलाय. त्याचा आरोग्य व्यवस्थेवर ताण आला असून ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थनं केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर काही समाजकंटकांनी समाजमाध्यमावर त्याचा फस नंबर शेअर केला आणि त्याचा भयंकर त्रास अभिनेता सिद्धार्थला सोसावा लागला.

    सोशल मिडियावर फोन नंबर जाहीर केल्यानंतर आपल्याला धमकीचे ५०० पेक्षा अधिक फोन आल्याचं सिद्धार्थनं म्हटलंय. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांनाही धमकीचेे आणि अश्लिल भाषेत शिविगाळ करणारे फोन आल्याची तक्रार सिद्धार्थनं केलीय. यातील सर्वच्या सर्व कॉल आपण रेकॉर्ड केले असून त्याचा तपशील पोलिसांना दिल्याचंही त्यांनं सांगितलंय.

    तमिळनाडूतील भाजप आयटी सेलकडून आपला नंबर लिक करण्यात आल्याचा आरोप सिद्धार्थनं केलाय. आपल्या कुटुंबियांना बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचंही सिद्धार्थनं तक्रारीत म्हटलंय. याबाबतच्या ट्विटमध्ये त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही टॅग केलंय.

    देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि व्हेटिलेटर्स यांचा तुटवडा आहे. याबाबत सिद्धार्थ सोशल मिडियात सातत्यानं आपली भूमिका मांडत असून सरकारवर टीका करत आहे. अनेकांना मदत करण्याच्या हेतूने तो ऑक्सिजन प्लँटचे आणि लॅबचेही नंबर शेअर करत आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी आपण गप्प बसणार नसल्याचंही त्यानं म्हटलंय.