अद्रमुक-भाजपाला झटका; अभिनेता विजयकांतने सोडली साथ

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकने राज्यातील ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत पक्षाला ४४.३ टक्के मताधिक्य प्राप्त झाले होते. दुसरीकडे, ५. १ टक्के मते प्राप्त झाल्यानंतरही विजयकांतच्या पक्षाला एकही जागा मिळू शकली नव्हती.

    चेन्नई: तामिळनाडूत अद्रमुक-भाजपा युतीला निवडणुकीपूर्वीच जबर झटका बसला आहे. अभिनेता विजयकांत यांच्या नेतृत्वातील डीएमडीके या पक्षाने पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकांपूर्वीच युतीतून काढता पाय घेतला आहे. तीन टप्प्यातील चर्चेनंतरही अद्रमुकने दिलेल्या आश्वासनानुसार जागा देण्यास नकार दिल्याचे कारण त्यांनी पुढे केले. राज्यात ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून दोन मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विशेष म्हणजे जे. जयललिता यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत अद्रमुकची अग्निपरीक्षा आहे.

    द्रमुकने केला होता दावा
    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अद्रमुकने राज्यातील ३९ पैकी ३७ जागांवर विजय मिळविला होता. या निवडणुकीत पक्षाला ४४.३ टक्के मताधिक्य प्राप्त झाले होते. दुसरीकडे, ५. १ टक्के मते प्राप्त झाल्यानंतरही विजयकांतच्या पक्षाला एकही जागा मिळू शकली नव्हती.२०१९च्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने डीमडीकेने युतीसंदर्भात संपर्क साधला होता, असा दावा केला होता.