Arrest

बंगळुरूमध्ये अवैध पद्धतीने कोकोनची उच्च किंमतीत (smuggling high-value cocaine into Bengaluru) तस्करी करणाऱ्या नागरिकाला गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयकडून पकडण्यात यश मिळाले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयच्या (DRI) अधिकाऱ्यांनी पश्चिम आशियातून येणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे.

    बंगळुरू : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Kempegowda International Airport) अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तस्करी प्रकरणी एका आफ्रिकन नागरिकाला (African national) अटक केली आहे. तब्बल १.३ किलोचे कोकेन कॅप्सूलच्या (smuggling cocaine capsules) स्वरूपात पोटात लपवून कोकेनची तस्करी करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

    बंगळुरूमध्ये अवैध पद्धतीने कोकोनची उच्च किंमतीत (smuggling high-value cocaine into Bengaluru) तस्करी करणाऱ्या नागरिकाला गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयकडून पकडण्यात यश मिळाले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयच्या (DRI) अधिकाऱ्यांनी पश्चिम आशियातून येणाऱ्या प्रवाशाला अटक केली आहे.

    ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाने सांगितलं की, किडनीच्या औषधोपचारासाठी मी बंगळुरू शहरात आलो आहे. तसेच माझ्याकडे मेडिकल व्हिसा देखील आहे. परंतु मेडिकल स्कॅनसाठी आरोपीला नेले असता, मोठा खुलासा समोर आला आहे. तो म्हणजे आरोपी चक्क ड्रग्जच्या कॅप्सूल पोटात लपवून घेऊन जात होता.

    दरम्यान, कॅप्सूलची तपासणी केली असता, त्यामध्ये कोकेन आढळून आले. तसेच आरोपीला त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पोटातून कॅप्सूल्स काढण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पुढील चौकशी करण्यात येत आहे.