तब्बल ३२ वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये साजरा झाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा महोत्सव

यापूर्वी १९८९ मध्ये कश्मीरातील कृष्णभक्तांनी जन्माष्टमीसाजरी केली होती. परंतु त्यानंतर दहशतवाद्यांच्या धाकामुळे आणि पंडितांच्या कश्मीरातील पलायनामुळे कश्मीर खोऱ्यात जन्माष्टमी सार्वजनिकरीत्या साजरी होऊ शकली नव्हती.

    कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत देशात सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत आहे. अशातच जम्मू-कश्मीर पंडितांसाठी यंदाची गोकुळाष्टमी खास ठरली आहे. काश्मिमध्ये तब्बल ३२ वर्षांनंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवात पंडितांनी मोठ्या संख्येने सहभागी होत कोरोनाचे संकट संपुष्टात आणण्याचे साकडेही यावेळी घालण्यात आले. या मिरवणुकीत सामील हिंदू भक्तगणांनी श्रीनगरच्या सडकेवर जय श्रीकृष्ण, हाथी-घोडा पालखी, जय कन्हैयालाल की अशा घोषणाही दिल्या. महिला भक्तांनी रस्त्यावर फेर धरून फुगडय़ाही घातल्या. कश्मीरवासीयांसाठी हे सर्व वेगळेच वातावरण ठरले.

    यापूर्वी १९८९ मध्ये कश्मीरातील कृष्णभक्तांनी जन्माष्टमीसाजरी केली होती. परंतु त्यानंतर दहशतवाद्यांच्या धाकामुळे आणि पंडितांच्या कश्मीरातील पलायनामुळे कश्मीर खोऱ्यात जन्माष्टमी सार्वजनिकरीत्या साजरी होऊ शकली नव्हती. जम्मू-कश्मीरातील ३७० कलम हटवल्यावर गेल्या दोन वर्षांत कश्मीर खोऱ्यातील वातावरण कश्मिरी पंडितांसाठी अनुकूल झाले आहे.