कोरोनानंतर बिहारमध्ये ब्लॅक फंगसमुळे हाहाकार

बिहारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. परंतु असं असतानाच आता ब्लॅक फंगस या आजारानं प्रशासनासमोरच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत बिहारमध्ये कोरोनापेक्षाही अधिक ब्लॅक फंगसच्या आजाराच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे. 

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी लागू केलेल्या निर्बंधांनंतर यावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. असं असलं तरी आता ब्लॅग फंगसनं अनेकांच्या चिंता वाढवल्या आहे.

    बिहारमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. परंतु असं असतानाच आता ब्लॅक फंगस या आजारानं प्रशासनासमोरच्या चिंता वाढवल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत बिहारमध्ये कोरोनापेक्षाही अधिक ब्लॅक फंगसच्या आजाराच्या रुग्णांना दाखल करण्यात आलं आहे.

    आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. त्याच वेळी, गेल्या २४ तासांत ब्लॅक फंगसमुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत ब्लॅक फंगसचा वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं ब्लॅक फंगससाठी असलेल्या बेड्सची संख्या वाढवली आहे.