corona vaccine

कोरोनाची लस(corona vaccination) घेतलेल्या तेलंगणमधील(telangana) एका आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू (health worker died)झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

कोरोनाची लस(corona vaccination) घेतलेल्या तेलंगणमधील(telangana) एका आरोग्य कर्मचाऱ्याचा बुधवारी मृत्यू (health worker died)झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूनंतर राज्य सरकारने हा मृत्यू कोरोना लसीमुळे झाला नसल्याचे म्हटले आहे.  दरम्यान या आरोग्य कर्मचाऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, “१९ जानेवारीला या आरोग्य कर्मचाऱ्याला लस देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या छातीत दुखू लागलं होतं. पहाटे ५.३० वाजता रुग्णालयात आणलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता.

आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही दोन्ही वेळा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची शक्यता फेटाळली होती.