कोविशिल्डनंतर आता कोवॅक्सिननेही कमी केले दर; जाणून घ्या नवी किंमत

कोवॅक्सिन लशीचा प्रति डोस राज्य सरकारसाठी ६०० रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा १२०० रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे.

    हैदराबाद: कोविशिल्ड (covishield) पाठोपाठ आता कोवॅक्सिन (Covaxin) लशीची किंमतही (Covaxin price) कमी करण्यात आली आहे. दोन्ही कोरोना लशी आणखी स्वस्त (Corona vaccine price) झाल्या आहेत. भारत बायोटेकेने (Bharat biotech) आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. कोवॅक्सिनचे दरही आता कमी करण्यात आले आहेत.

    कोवॅक्सिन लशीचा प्रति डोस राज्य सरकारसाठी ६०० रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा १२०० रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे.

    याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत कमी केली होती. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये होती.