घटस्फोटानंतर पोटगी मागेल म्हणून ‘अमेरिकेत’ बसून पतीने भारतात ‘पत्नीची’ घडवून आणली हत्या

जया यांनी पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. परंतु घटस्फोट दिला तर पोटगी द्यावी लागेल असा विचार पतीच्या मनात आला. त्यामुळे त्याने जया यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पतीने आपल्या मेव्हण्याची मदत घेतली.अन ट्रक चालकांच्या टोळीला सुपारी देऊन जयाची हत्या घडवून आणली.

    चेन्नई:माणसाच्या विकृतीचा कळस गाठल्याची घटना चेन्नईमध्ये घडून आली आहे. अमेरिकत राहणाऱ्या पतीने भारतात राहणाऱ्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने पत्नीच्या हत्येची सुपारी देत तिचा काटा काढला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पत्नीचे नाव जयाभारती आहे. जयभारती याटुव्हीलर व्रुऊन जाताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पळून गेलेल्या ट्रक चालकाच्या टोळीला अटक केल्यानंतर संपूर्ण घटनेचा उलघडा झाला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जया याचा पती अमेरिकेत एका आयटी कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर जयाही त्यांच्या सोबत अमेरिकेला गेल्या मात्र त्याच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याने त्या भारतात परत आल्या. दोघांमधील दुरावा कमी करण्याचे प्रयत्न कुटुंबीयांनी केले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर जया यांनी पतीला घटस्फोटाची नोटीस पाठवली. परंतु घटस्फोट दिला तर पोटगी द्यावी लागेल असा विचार पतीच्या मनात आला. त्यामुळे त्याने जया यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पतीने आपल्या मेव्हण्याची मदत घेतली.अन ट्रक चालकांच्या टोळीला सुपारी देऊन जयाची हत्या घडवून आणली.
    घटनेनंतर अवघ्या काहीत तासातच पोलिसांनी गुन्हयाचा शोध लावला आहे. पोलिसांनी ट्रक मालक सेंठीकुमारसह जगन, प्रसन्न आणि राजा अशा चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.