After drugs, gold, silver, human hair is now being smuggled into Myanmar via India's Mizoram. These cases are then sent to China

म्यानमार मध्ये या केसांवर प्रकिया केली जाते. यानंतर हे केस चीन मध्ये विग बनवण्यासाठी पाठवले जातात. चीन हे विग भारतासोबतच इतर देशात विक्रीसाठी पाठवते.

    आयझॉल : ड्रग्स, सोने, चांदीनंतर आता मानवी केसांची तस्करी होत आहे. आसाम रायफल्सच्या जवानांनी मानवी केसांनी भरलेले २ ट्रक पकडले आहेत. या करावाई नंतर दोन कोटींचे केस हस्तगत केले आहेत.

    आसाम रायफल्सच्या सेरचीप बटालियनने चंपाई जिल्हात नाकाबंदी दरम्यान हे ट्रक पकडलेत. कस्टम विभागाची मदत घेऊन ही कारवाई करण्यात आली. आंध्र प्रदेशातील तिरूपती मंदिरातून ही केसं गोळा करून मेझोराम येथे पाठवण्यात येतात. तिथून त्यांची तस्करी म्यानमारमध्ये करण्यात येते.

    म्यानमार मध्ये या केसांवर प्रकिया केली जाते. यानंतर हे केस चीन मध्ये विग बनवण्यासाठी पाठवले जातात. चीन हे विग भारतासोबतच इतर देशात विक्रीसाठी पाठवते.

    आसाम रायफल्सच्या या कारवाईत १२० बॅगमध्ये भरलेले ५० किलो केस हस्तगत करण्यात आले आहेत. याची किंमत सुमारे दोन कोटी रूपये इतकी आहे.

    भारत आणि म्यानमार मध्ये कोणतीही दर्शनी सीमा नाही. या दोन्ही देशांच्या सीमा खुल्या आहेत. यामुळे या भागातून ड्रग्स, सोने, चांदी यांसारख्या वस्तूंची तस्करी होत असते. याचाच फायदा घेत आता या भागातून केसांची तस्करी होताना दिसत आहे.