rape

उत्तर प्रदेशातील (UP) हाथरस (Hathras) येथील घटनेनंतर उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये (Balrampur) दलित तरूणीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील (UP) हाथरस (Hathras) येथील घटनेनंतर उत्तर प्रदेशातीलच बलरामपूरमध्ये (Balrampur) दलित तरूणीसोबत सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरूणांनी आपल्या ओळखीच्या तरूणीला भेटण्यासाठी बोलावलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तरूणांनी गंभीर परिस्थितीत त्या तरूणीला रिक्षात (Auto) बसवून तिच्या घरी पाठवून दिलं. परंतु त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असताच, या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी (Police)  दिलेल्या माहितीनुसार, शाहिद (Shahid) आणि साहिल (Sahil) अशी या दोन आरोपींची (Two Accused) नावे आहेत. पीडितेच्या हात, पाय, कंबरेला इजा पोहोचवण्यात आल्याचं वृत्त निराधार असल्याचं सांगत शवविच्छेदन अहवालात याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

बलरामपूरमधील गैथली पोलीस स्थानकात तरूणी गायब झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीत २२ वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे की, ती एका खाजगी कंपनीत नोकरी करायची. मंगळवारी मुलगी कामावर गेली. पण संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. थोड्या वेळाने मुलगी रिक्षाने घरी आली तेव्हा तिच्या हाताला सलाईन लावलं होतं आणि तिची परिस्थिती खूप वाईट होती. कुटुंबीय तिला तातडीने हॉस्पिटलला घेऊन गेले. पण, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीटरवर लिहिलं की, भाजप सरकारने हाथरस प्रमाणे निष्काळजीपणा आणि सारवासारव करू नये आणि तात्काळ कारवाई करावी.