rape

रागाच्या भरात या पतीने पत्नीवर लावला जुगाराचा डाव लावला. यात तो हरला. हरल्यानंतर त्याने पत्नीला इतर जुगाऱ्यांच्या हवाली केले. सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता करू नये, यासाठी त्याने तिला धमकावले आणि मारहाणही केली. ऐवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. यात ती गंभीर जखमी झाली.

भागलपूर : एका नराधमाने आपल्या पत्नीवर लावला जुगाराचा डाव लावला. जुगारात हरल्यानंतर पतीने आपल्याच पत्नीला नराधमांच्या हवाली केले. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर पतीने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अॅसिड फेकले. बिहार मधील भागलपूर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पीडित महिलेच्या लग्नाला दहा वर्षे झाली तरी त्यांना मुलगा झाला  नाही. या कारणावरुन तिचा पती आणि सासरची मंडळी तिच्याशी नेहमी भांडत असे.

रागाच्या भरात या पतीने पत्नीवर लावला जुगाराचा डाव लावला. यात तो हरला. हरल्यानंतर त्याने पत्नीला इतर जुगाऱ्यांच्या हवाली केले. सर्वांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता करू नये, यासाठी त्याने तिला धमकावले आणि मारहाणही केली. ऐवढ्यावरच न थांबता या नराधमाने तिच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. यात ती गंभीर जखमी झाली.

रुग्णालयात उपचार घेत असताना तिने पती आणि सासरच्या मंडळीची नजर चुकवत पलायन केले आणि थेट माहेर गाठले. यानंतर तिने माहरेच्यांच्या मदतीने पतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.