mayawati

मायावती यांनी आज पत्रकार परिषद(mayawati press conference) घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथसर आणि बलरापूर येथे दोन तरुणींवर बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर येथील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती(mayawati) यांनी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट(presidents ruleinuttar pradesh) लागू करण्याची मागणी केली आहे.

मायावती यांनी आज पत्रकार परिषद(mayawati press conference) घेऊन उत्तर प्रदेशातील या दोन्ही घटनांचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश सांभाळता येत नसेल तर त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेऊन इतरांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करा किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी मायावती यांनी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून निवडून आले आहेत. त्यांनी किमान उत्तर प्रदेशाकडे तरी लक्ष द्यावे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.