फेसबुकवर जाहिरात पाहून या महिलेने फोन केला अन्…

सविता शर्मा असं या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या दक्षिण बंगळुरुमधील येल्लाचेन्नाहल्ली परिसरात राहतात. फेसबुकवर सर्फिंग करत असताना ऑनलाइन फूड डिलेव्हरीसंदर्भात एक जाहिरात त्यांना दिसली आणि या जाहीरातीला भुलून त्यांची फसवणुक झाली आहे.

बंगळुरु : फेसबुकवरील जाहिरात पाहून जेवण ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकच्या माध्यमातून बंगळुरुत एका ५८ वर्षीय महिलेला फेसबुकवरुन ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

सविता शर्मा असं या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्या दक्षिण बंगळुरुमधील येल्लाचेन्नाहल्ली परिसरात राहतात. फेसबुकवर सर्फिंग करत असताना ऑनलाइन फूड डिलेव्हरीसंदर्भात एक जाहिरात त्यांना दिसली आणि या जाहीरातीला भुलून त्यांची फसवणुक झाली आहे.

२५० रुपयांची एक थाळी मागवा आणि एक मोफत मिळवा अशी ही जाहिरात होती. शर्मा यांनी या जाहिरातीमधील क्रमांकावर फोन केला आणि आपल्याला थाळी ऑर्डर करायची असल्याचे सांगितले. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला थाळीची ऑर्डर बूक करण्यासाठी १० रुपयांचे अ‍ॅडव्हान्स पेमेंट करावं लागेल असं सांगितलं. आता १० रुपये भरुन उरलेले पैसे तुम्ही जेवण घरी घेऊन येणाऱ्या व्यक्तीकडे कॅश ऑन डिलेव्हरी पद्धतीने देऊ शकता, असं समोरच्या व्यक्तीने सांगितलं.

यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर एक फॉर्म होता. या फॉर्ममधील माहिती भरताना शर्मा यांनी आपला डेबिट कार्ड क्रमांक आणि पिन नंबरही शेअर केला. यानंतर पुढील काही मिनिटांमध्ये शर्मा यांच्या खात्यातून ४९ हजार ९९६ रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आला. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर क्राइम युनिटकडे तक्रार दाखल केली.