After the theft, I fell asleep and was woken up by the police

जरौलीत वास्तव्यास असलेल्या पवन गुप्तांची घरात चोरी झाली. पवन गुप्ता यांनी नुकतेच नवे घर बांधले. त्यांच्या घराजवळ कोणतेही घर नाही. गेल्या शनिवारी पवन कुटुंबासोबत एका खोलीत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनी कपाटातील लॉकर तोडून दोन मंगळसूत्र, कर्णाभूषणांचा एक जोड, पैजणांचे दोन जोड आणि दोन लाख रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी पवन यांनी रविवारी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

  कानपूर : उत्तरप्रदेशमधील कानपूरमध्ये चोरीची एक अजब घटना घडली आहे. गेल्या शनिवारी घडलेली घटना आता उघडकीस आली आहे. एका घरात चोरी करण्यासाठी तीन चोर रात्रीच्या सुमारास शिरले. त्यातला एक चोर गादीवर जाऊन झोपला. गादी आरामदायी असल्याने तिथेच त्याचा डोळा लागला. दरम्यान, त्याच्या दोन साथीदारांनी हात साफ करून पळ काढला.

  सकाळ झाल्यावर घरमालक उठला. घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मात्र एक चोर गादीवर झोपला असल्याचे मालकाला दिसले. मालकांनी पोलिसांना बोलविले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले तरी चोर झोपलेलाच होता. पोलिसांनी त्याला उठविले आणि ताब्यात घेतले. बर्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

  जरौलीत वास्तव्यास असलेल्या पवन गुप्तांची घरात चोरी झाली. पवन गुप्ता यांनी नुकतेच नवे घर बांधले. त्यांच्या घराजवळ कोणतेही घर नाही. गेल्या शनिवारी पवन कुटुंबासोबत एका खोलीत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास तीन चोर त्यांच्या घरात शिरले. त्यांनी कपाटातील लॉकर तोडून दोन मंगळसूत्र, कर्णाभूषणांचा एक जोड, पैजणांचे दोन जोड आणि दोन लाख रुपये घेऊन पळ काढला. या प्रकरणी पवन यांनी रविवारी बर्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

  रविवारी सकाळी पवन यांना घरातले सर्व सामान अस्ताव्यस्त स्थितीत दिसले. कपाटाचे लॉकर तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शेजारच्या खोलीत एक चोर त्यांना झोपलेला दिसला. त्याला पाहून कुटुंब हैराण झाले. त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले. चोरट्याने त्याची दोन्ही साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. आता पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना